उर्फी जावेदविरोधात थेट पोलिस आयुक्तांकडेच तक्रार

0

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ संतापल्या


मुंबई. फॅशनमुळे स्टाईलमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री उर्फी जावेदविरोधात (Actress Urfi Javed) भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वघ (BJP women state president Chitra Wagh) चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. वाघ यांनी थेट पोलिस आयुक्तांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी (Demand action by meeting the Commissioner of Police ) केली आहे. त्यामुळे उर्फीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, पोलिस उर्फी जावेदवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रा वाघ यांनी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे उर्फीची तक्रार केली आहे. मुंबईतील रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. यासाठी आज त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेऊन उर्फीविरोधात तक्रारही दाखल केली आहे. आयुक्त फणसाळकर यांच्या भेटीचे आणि त्यांना पत्र दिल्याचा एक फोटोही चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे, असे वाघ यांनी तक्रारीत म्हटले आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही. मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहांचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहेत, याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाघ यानी केली आहे.
दरम्यान, उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तण करणे या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यातच वाघ यांनी थेट पोलिस आयुक्तांनाच तक्रारीचे पत्र दिल्यामुळे पोलेस आयुक्त आता उर्फीवर कोणत्या कायद्याखाली कारवाई करतात, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा