नागपूर – केंद्र सरकारचे चुकीचे धोरण वाढती महागाई, उज्वला गैस, पेट्रोल दरवृद्धीच्या विरोधात नागपुर शहर काँग्रेस ओबीसी आघाडीच्या वतीने आज शहरात तुकडोजी चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. घरगुती गैस सिलेंडरला श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली. यावेळी चुलीवर स्वयंपाक पेटवून महिलांनी आपला विरोध यावेळी प्रकट केला.कांग्रेसचे कार्यकर्ते मच्छिन्द्र सावळे यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले .यावेळी शहर कांग्रेस ओबीसी आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबतच महिला कांग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .