नागपूरः(Nagpur) कापूस उत्पादकांबद्धल सरकारच्या उदासीन धोरणाच्या विरोधात ३ मे रोजी शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांच्या नेतृत्वात कापसाची होळी सत्याग्रह केला जाणार असल्याची माहिती शेतकरी चळवळीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली (Cotton Growers agitation in Pandharkawada) आहे. केंद्र सरकारने कापूस निर्यातीसाठी प्रती गाढी ३० हजार रुपये अनुदान जाहीर करावे व राज्य सरकारने महाराष्ट्रातील ८० लाखांवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५ हजार रुपये अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी ‘कापसाची होळी सत्याग्रह’ पांढरकवडा येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तिवारी यांनी सांगितले की, “मागील वर्षी कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव मिळाल्यामुळे यावर्षी विक्रमी १ कोटी १२ लाख हेक्टर मध्ये कापसाची लागवड करण्यात आली. त्यामध्ये संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खांदेश, उत्तर महाराष्ट्रसह मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात पेरा करण्यात आला होता. सुरवातीला प्रचंड पावसाने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व ७० टक्के पीक सुद्धा नासले. मात्र महाराष्ट्रातील ८० लाखावर शेतकऱ्यांनी प्रचंड वाढलेला लागवडीचा खर्च करुन जेमतेम ३० ते ४० टक्के कापसाचे उत्त्पन्न घेतले. मागील डिसेम्बरपासून कापसाचे भाव वाढतील, या आशेने सर्व कापूस घरी ठेवून कापसाचे भाव वाढतील, या आशेने वाट पाहत आहे. कापसाचा भाव आता जेमतेम ७५०० रुपयावर अटकला आहे. मात्र, महाराष्ट्रातील एकमेव नगदी पीक कापसाची दाणादाण ही (Central Govt)केंद्र सरकारच्या कापूस उत्पादक शेतकरी विरोधी धोरणामुळे असून (maharashtra)महाराष्ट्राचे सरकार सुद्धा या गंभीर विषयावर मौन घेऊन असल्यामुळे येत्या ३ मे ला हजारो कापूस उत्पादक शेतकरी जेष्ठ शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करणार आहेत.”
३२०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
यावर्षी कापसाची नापिकी व भाव पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आले आहेत व यातच कर्जबाजारी ३२०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून त्यांची दखल राज्य सरकार घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.