संपानंतर निर्णय, डॉक्टरांसाठी गुड न्यूज -1432 पदे भरणार

0

मुंबई. निवासी डॉक्टरांनी (Resident Doctor ) चार दिवसांपूर्वी राज्यव्यापी संपू पुकारला होता. वरिष्ठ निवासी डॉक्टरांची 1432 पदे तत्काळ भरण्याची त्यांची प्रमुख मागणी होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आपला संप मागे घेतला. त्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वसतीगृहाच्या डागडुजीसाठी शासनाने निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. जेजे महाविद्यालयासाठी 13 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सोबतच वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 पदांच्या भरतीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्याचा निर्णय (posts of Senior Resident Doctors will be filled) घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे निवासी डॉक्टरांसह राज्यातील रुग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.


गिरीश महाजन यांनी मार्डच्या प्रतिनिधींसोबत यशस्वी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरच मार्ड संघटनेने संप मागे घेतला होता. आश्वासनाप्रमाणे वरिष्ठ निवासी संवर्गातील 1432 पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय राज्यातील लाखो रुग्णांनाही दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीत काम करणाऱ्या या निवासी डॉक्टरांवरील ताण निम्म्याने कमी होणार आहे.


शासनाच्या 23 वैद्यकीय महाविद्यालयांच्या आस्थापनेवर नव्याने पद निर्मिती केली जाणार आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संख्या आता 2 हजार 276 पर्यंत वाढणार आहे. मार्डला दिलेल्या आश्वासनाची राज्य सरकार दोन दिवसांत पूर्तता करणार आहे.
चार दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना वरिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती दोन दिवसांत करण्याचे आश्वासित केले होते. त्याची पूर्तता केल्याने आता डॉक्टरांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. निवासी डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान निवासी डॉक्टरांच्या निवासाची डागडुजी आणि पुनर्बांधणी तात्काळ करावी, अशी मागणी आता मार्डने केली आहे.

Shankhnaad News | Ep: 69 वेजिटेबल थाई ग्रीन करी आणि काजुन चिकन | How to make thai green curry