नागपूर NAGPUR – भारत देश राममय झालेला आहे. सुवर्ण अक्षरात आजचा दिवस लिहिला जाईल. इतिहासात कधीही न झालेला दीपोत्सव आज देशभरात पाहायला मिळेल ,आज मोठी दिवाळी संपूर्ण देशभरात साजरी होणार आहे असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष CHNDRASHEKHR BAWANKULE चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महालक्ष्मी कोराडी मंदिरात 6000 किलोचा राम हलवा तयार झाला यानिमित्ताने ते बोलत होते. आज राजकीय चर्चा नको, राजकारण करणाऱ्यांना लखलाभ. आम्ही अस्मिता जपणारे लोक आहोत.
हे भरकटलेले लोक आहेत. राम जन्मभूमी चे निमंत्रण दिल्यावरही त्यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं. हा मान अपमान आणि प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. मात्र,उद्धव ठाकरेंच्या हे नशिबात नाही. त्यांना तो सोहळा पाहत आला असता असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला. महायुतीचे सर्व नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही एका दिवशी रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहोत असे स्पष्ट केले.देवेंद्र फडणवीस यांचे आयुष्य निर्मळ आहे.राम जन्मभूमीच्या आंदोलनात ते कारसेवक म्हणून गेले होते. धर्माची भूमिका त्यांनी निभवली कारसेवेत मोठे योगदान आहे असेही बावनकुळे म्हणाले.