मुंबईच्या मढमधील त्या बेकायदेशीर स्टुडिओचे पाडकाम सुरु

0

मुंबईः (MUMBAI)मुंबईच्या मढ परिसरात बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या स्टुडिओचे पाडकाम (Demolition work of illegal studio) अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळपासून सुरु झाले. माजी मंत्री(Aditya Thackeray) आदित्य ठाकरे आणि काँग्रेस नेते (Aslam Sheikh)अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने या अनधिकृत स्टुडिओची उभारणी झाली होती, असा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप होता. या स्टुडिओमध्ये रामसेतू, , (Adipurusha)आदिपुरुष या सारख्या चित्रपटांचे शुटींग झाले आहे, हे विशेष. अनधिकृत स्टुडिओचे पाडकाम सुरु होताच “ठाकरे सरकारच्या (Corruption)भ्रष्टाचाराचे स्मारक आज उद्धवस्त झाले”, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी व्यक्त केली.

 

किरीट सोमय्या (Kirit Somayya)यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी २०२१ मध्ये हे भ्रष्टाचाराचे स्मारक बांधले. तात्पुरता स्टुडिओ म्हणून शंभर फूट उंचीचे बांधकाम केले. पाच लाख स्क्वेअर फूट बांधकाम फेब्रुवारी २०२१ मध्ये केले. त्याला (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे सरकारने मान्यता दिली. या स्टुडिओवर कारवाई करायला दोन वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला. उद्धव ठाकरे सरकारची माफियागिरी आणि भ्रष्टाचारचे हे एक हजार कोटींचे स्मारक आज उद्धवस्त करण्याची सुरुवात झाली असल्याचे ते म्हणाले.
मालाड, मढ येथील ४९ बेकायदेशीर स्टुडिओ आणि २२ बेकायदेशीर बंगले पाडण्याची मागणी सोमय्या यांनी महापालिकेकडे केली होती. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. तत्कालीन सरकार, मंत्री आणि पालकमंत्र्यांनी या प्रकरणी कानाडोळा केला. स्टुडिओ, बंगले उभारताना महापालिका, सरकारी प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती तसेच सीआरझेडचेही उल्लंघन करण्यात आले, असा आरोप होता. नॅशनल ग्रीन ट्रीब्युनलने हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.

 

चिकन साते विथ पीनट सॉस आणि मोतीचुर रबडी पर्फेत|Chicken Satay With PeanutSauce|Motichur Rabdi parphet