मुंबईः (MUMBAI)मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ‘सागर’ बंगल्यावरील खानपानाच्या (Expanses on Varsha and Sagar Bunglow) अवाढव्य खर्चावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. आता त्याची दखल घेत राज्य सरकारने या दोन्ही बंगल्यांवरील खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला पाच कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी (Shree Sukhsagar Hospitality)श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे.(Umbrella Caterers) छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे.
हा मुद्दा उपस्थित होण्याचे कारण म्हणजे मागील चार महिन्यात (EKNATH SHINDE)मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आले होते. त्यावर खोचक टीका करताना अजित पवार यांनी सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा सवाल उपस्थित केला होता. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आले. एवढे बील कसे काय? चहामध्ये सोन्याचे पाणी वगैरे घातले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. अजित पवार यांच्या टीकेवर एकनाथ शिंदे उत्तर दिले होते. (CORONA)कोरोना काळात वर्षा बंगला बंद असताना किती खर्च झाला, याची माहिती घेतली का? आमच्याकडे गेल्या आठ-नऊ महिन्यात राज्यभरातून सोन्यासारखी माणसे येत आहेत. त्यांच्यासाठी चहापाणी करायचे नाही का? आपली ही संस्कृती नाही का?, असा सवाल त्यांनी केला होता. मात्र, आता या दोन्ही बंगल्याचा खर्च नियंत्रणात आणण्यात येत आहे.