गोंदिया – गेल्या अनेक दिवसापासून गोंदियात पावसाचे आगमन झाले नसल्याने सामान्य नागरिकांबरोबर शेतकरी सुद्धा अडचणीत सापडला होता. शेतकऱ्यांची अनेक शेतीची कामे कोलमडली होती आणि त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली. परंतु कालपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आणि शेतकरी राजा आपल्या शेतीच्या कामाकडे वळला असल्याचे पाहावयास मिळाले. अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी बियाणे टाकलेले होते त्यांना सुद्धा या पावसामुळे दिलासा मिळाला. ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत शेतीची काम केली नव्हती त्या सर्व शेतकरी आता मशागतीच्या कामाकडे वळले असून मशागतीच्या सोबतच धान पिकाचे बियाणे सुद्धा लावत असताना पाहावयास मिळते. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळत आहे.