गोंदिया- गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धरणे , तलावे आहेत. जून महिना संपत आला असला तरी सुद्धा मात्र जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाका कायम आहे .गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला आहे आणि मृग नक्षत्र लागून आज 20 ते 25 दिवस लोटे आहेत तरी मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस पडलं नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील तलाव , धरणे हे अजूनही कोरडे पडले आहेत आणि जर पावसाने येणाऱ्या दिवसात गोंदिया मध्ये हजेरी लावली नाही तर जिल्ह्यात पाण्याच्या प्रश्न पेटण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात पुजारीटोला धरण ,शिरपूर धरण,कालीसरार धरण , इटीयाडोह धरण आणि धापेवाडा प्रकल्प यासारखे मोठे धरणे आणि प्रकल्प आहेत या धरणातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र जर सध्याच्या घडीचा विचार केला तर सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणामध्ये 80 टक्के पाणीसाठा आहे. देवरी तालुक्यातील शिरपूर धरणामध्ये शिरपूर धरणामध्ये 8 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे .कालीसरार धरणामध्ये 34 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह धरणामध्ये 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर धापेवाडा प्रकल्पात 35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. आणि हा पाणीसाठा सध्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करून ठेवण्यात आलेला आहे. जर पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ पोचू शकते आता तरी वरून देव प्रसन्न होऊन जिल्ह्यात पावसाचे आगमन व्हावे याकडे नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.