NAGPUR : रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील प्रवेश द्वारा समोर अनेक वर्षापासून संत्रा मार्केट पोलीस चौकी होती. परंतु मेट्रो प्रकल्प अंतर्गत तिथे मेट्रो स्टेशन चे निर्माण करण्यात आले. त्या वेळेस कार्यात अडथळा म्हणून पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन वर पोलीस चौकी तोडण्यात आली. परंतु मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर सुध्दा अनेक महिन्या पासून पोलीस चौकी बांधण्यात आली नाही. येथे अनेक भोजनालय , संत्रा मार्केट , जवळच पोद्दारेश्वर राम मंदिर तसेच रहिवाशी एरिया आहे. रेल्वे स्टेशन चे पूर्व दिशेचे प्रवेश द्वार असून येथे दररोज 24 तास प्रवाशांची सुध्दा वर्दळ असते. अनेक असामाजिक तत्व या ठिकाणी असतात कुणाचे पाकीट , मोबाईल चोरणे किंवा दमदाटी करून मुद्देमाल हिसकावणे असे प्रकार सुरू आहे.
तसेच एखाद्या प्रवाशाने कैब जर बुक केली तर त्यांना प्रवेश द्वारा जवळ उभे राहू न देता वादविवाद घालण्याचे काम काही ऑटो रिक्षा वाले करतात. तसेच या सर्व गोष्टींचा त्रास स्थानिक रहिवाशांना देखील होतो. काही दिवसापासून असे निदर्शनास आले आहे की , पोलीस चौकी च्या जागेवर पूर्वी चौकीच्या मागे असलेले आर्या भोजनालय यांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केलेली असून बाजूलाच असलेले मंदिर व आर्या भोजनालय च्या मध्ये असलेली 5 फुटाच्या गल्लीवर देखील अतिक्रमण करण्यात आलेले आहे. याबद्दल कुणी जर विचारणा केली तर त्यांना आर्या भोजनालय च्या मालक कडून दमदाटी केली जाते. त्यामुळे परिसरात असलेल्या लोकांमध्ये रोष असून येथे एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पोलीस चौकी च्या जागेवर परत पोलीस चौकी पूर्ववत सुरू करावी.या मागणी साठी शहर प्रवक्ता नूतन रेवतकर यांनी शिष्टमंडळा सह गणेशपेठ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हृषिकेश घाडगे यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात श्री. अर्शद सिद्दीकी , श्री. राजा खान , श्री. अझहर पटेल , बबिता मांडवकर उपस्थित होते. चौकी बांधकाम साठी सामाजिक वर्गणीतून मदत करण्याची तयारी देखील याप्रसंगी सर्वांनी बोलून दाखविली.