इसपार या उसपार, ये लढाई आरपार

0

मतदार बंधू आणि भगिनींनो, आंधळेपणाने अजिबात नाही तर मतदान नक्कीच करू आणि असे करू कि, गर्व वाटला पाहिजे, लाज नाही !! महाआघाडीची जाहिरात बघितली, कोणत्या सडक्या मेंदूतून ती बाहेर पडली, कोणास ठाऊक, पण ज्याने कोणी हलकटाने ती जाहिरात तयार केली आणि ज्या नालायक नीच नेत्याने किंवा महाआघाडीतल्या ज्या राजकीय घटक पक्षाने त्याला परवानगी दिली त्या साऱ्यांच्या तोंडात त्यांच्या या अशा खोटारड्या जाहिरातीमुळे नक्की किडे पडतील आणि एक दिवस लवकरच त्यांच्या नेतृत्वाचे दिवाळे निघेल, हरामखोर साले !! सत्यानाश व्हायला हवा अशा थर्ड ग्रेड नेत्यांचा. जाहिरातीचा मसुदा असा, ‘ पहिल्या अनाजीने स्वराज्याला लुटले आणि दुसर्याने अवघ्या महाराष्ट्राचे अन शेतकार्यांचे स्वप्न उध्वस्त केले ‘ महाभारतात अर्जुन जसा शेवटी त्या दुर्योधनाच्या छातीवर बसून त्याच्यावर गदेने प्रहार करीत होता, आजच्या महाभारताच्या घनघोर राजकीय लढाईत तो आधुनिक देवेंद्र रुपी अर्जुन आणि त्याचे एकनाथ पद्धतीचे महापराक्रमी साथीदार त्यांच्या विरोधकांवर ज्या आक्रमकतेने तुटून पडले आहेत त्यांना जखमी केले असल्याने या नालायक विरोधकांच्या हाती कायम असलेले जातीचे अस्त्र त्यांनी शेवटी बाहेर काढले आहे आणि या जाहिरातीतून थेट फडणवीसांना त्यांच्या ब्राम्हण जातीवरून डिवचले आहे विनाकारण अपमानित केले आहे त्यांची जात काढली आहे, महायुती त्यांच्या पवारांच्या जीवघेण्या समस्त महाआघाडीच्या अतिशय लाजिरवाण्या डावपेचांना पुरून उरली असल्याने निवडणूकरूपी सिनेमाच्या शेवटी शेवटी महाआघाडीतल्या खलनायकांनी ढुंगणातली विष्ठा त्यांच्या अंगावर फेकून मारावी असे नेहमीचे जातीचे अस्त्र बाहेर काढले आहे, सुदैवाने हे फडणवीस लुटणारे नाहींत तर लुटून देणारे आणि चौफेर प्रगत महाराष्ट्र घडविताना प्रगती कुठल्या जातीची त्यावर खालची मान देखील वर करून न बघणारे हे फडणवीस राज्यातल्या मतदारांना नेमके ठाऊक झालेले असल्याने एखाद्या सुपर स्टारचे जे स्वागत होते ते त्या शिंदे फडणवीसांचे होतांना बघून महाआघाडीतल्या कुठल्याशा नालायकाने कुठलाही अभ्यास किंवा विचार न करता फडणवीसांना अनाजीपंतांची उपमा देत त्यांना महाराष्ट्राचे आणि शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त करणारा नेता म्हटले आहे, कुठल्याशा विकृतीचे ते कृत्य आहे…

अमरावती शहर विधानसभा मतदार संघ वास्तविक भाजपासाठी कायम अनुकूल पण अजित पवारांच्या सतत पायात पाय येईल पद्धतीने कायम कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी धडपडणारे एक संजय खोडके त्यांच्या पत्नी माजी आमदार सुलभा खोडके, हट्टाला पेटून संजय यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी पदरात पाडून घेतली जणू महायुतीने स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतली कारण आपल्यावर अन्याय झाला हे स्थानिक प्रभावी भाजपा नेत्यांना तसे वाटणे स्वाभाविक होते नेमके तेच घडले माजी आमदार माजी नामदार जगदीश गुप्ता यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून ते याच ठिकाणाहून आता विधानसभा लढविताहेत आणि सुलभा खोडके जगदीश गुप्ता यांच्यासमोर महाआघाडीचे उमेदवार सुनील देशमुख याच भाजपाशी बेईमानी करून पुन्हा एकवार काँग्रेस मध्ये घुसले आहेत त्यांनी तेथे आता यासाठी खोडके यांना मोठे आव्हान दिले आहे कारण याच ठिकाणी बच्चू कडू यांच्या प्रहार तर्फे जे डॉ सय्यद अब्रार अन्य उमेदवार उभे होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर मुसलमानांची मते घेत सुलभा खोडके यांचा विजय बऱ्यापैकी सोपा केला असता पण डॉ सुनील देशमुखांची बायको नेमकी मुसलमान, त्यांनी म्हणे डॉ सय्यद यांना उमेदवारी मागे घेण्याची गळ घातली, नेमके तेच घडले, डॉ सय्यद यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली आणि मुसलमानांच्या जावयाचा म्हणजे डॉ सुनील देशमुख यांच्या विजयाचा मार्ग तेही बच्चू कडू यांना अडचणीत टाकून सुकर केला आहे, एकीकडे मुसलमान प्रिय काँग्रेस महाघाडीचे डॉ सुनील देशमुख आणि दुसरीकडे भाजपाचे बऱ्यापकी लोकप्रिय उमेदवार जगदीश गुप्ता, सुलभा खोडके आज जरी काहीशा अडचणीत सापडलेल्या असल्या तरीही अमरावतीकर समस्त हिंदू मतदार एकगठ्ठा मतदान तेही मोठ्या प्रमाणावर फक्त आणि फक्त महायुतीच्या सुलभा खोडके यांनाच करतील हि खात्री ताकद पणाला लावून फिरणारे भाजपाचे प्रभावी नेते प्रवीण पोटेंनी व्यक्त केली आहे.
अमरावती जिल्ह्यातले म्हणाल तर प्रस्थ म्हणाल तर राजकारणातले नारदमुनी म्हणून ओळखल्या जाणारे राणा दाम्पत्य, पूर्वी सुलभा खोडके राणा जेथून निवडून येतात त्या बडनेरा मधून राणा विरोधात निवडणूक लढायच्या आणि हमखास पडायच्या पराभूत व्हायच्या, सततचा अपशकुन टाळण्यासाठी खोडके दाम्पत्याने तेथून पळ काढला, आपला मुक्काम अमरावती शहर मतदार संघात ठोकला तेव्हा कुठे त्यांना यश मिळाले, राणा आणि खोडके दाम्पत्य जरी आज एकाच महायुतीमधून निवडणूक लढवीत असले तरी त्या दोघात विळ्या भोपळ्याचे सूत असल्याने मिसेस खोडके पराभूत होण्यासाठी राणा दाम्पत्य नक्कीच आपली शक्ती खर्ची घालतील त्यासाठी थेट फडणवीसांची तातडीने मध्यस्थी खोडके आणि राणा दोघांनाही विधानसभा खेचून आणण्यासाठी उपयोगी ठरेल. आणखी एक गम्मत सांगतो, डॉ सुनील देशमुख हे त्यांच्या अबोल एकलकोंड्या आणि महाकंजूष स्वभावामुळे अनेकांचे नावडते आहेत म्हणजे देशमुखांना खिसे न ठेवणारा नेता म्हणून ओळखल्या जाते, त्यांना रस्त्यात पाच रुपयाचे जाई नाणे दिसले तरी ते इतर निघून जाईपर्यंत त्या नाण्यावर पाय ठेवून उभे राहतील. बघूया अमरावतीमध्ये काय घडते ते…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी