फडनवीस म्हणाले दादाना ही सवय नाही,राजकारणात कोणीही अढळपद घेऊन येत नाही!

0

नागपूर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेच्या कामकाजात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित दादा यांना लक्ष्य केले. भाजपचे मिशन बारामती कायम असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले. पत्र परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, बारामतीत येऊन आव्हान देणारे त्यांना आजवर कुणी भेटलेच नाही. महाराष्ट्रव्यापी अभियानात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत गेले.फडणवीस यांनी अजित पवारांच्या टिकेलाही उत्तर दिले. राजकारणात कुणीही अढळपद घेऊन आलेले नाही. गत निवडणुकीत सुप्रिया सुळे प्रारंभी मागे होत्या. नंतर त्या कमी मतांनी जिंकल्या. इंदिरा गांधीसुद्धा कधीकाळी निवडणूक हरल्या. आमचे मिशन बारामती आहेच, सोबत मिशन महाराष्ट्रही असल्याचे सांगून बारामतीत जोरकस आव्हान देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान, हे अधिवेशन विदर्भाला खूप काही देऊन जाणारे ठरले. सुरुवातीचा गदारोळ वगळता विरोधकांचेही सहकार्य मिळाले. दोन वर्ष अधिवेशन झाले नाही. ध्यान उत्पादकांना 15000 रुपये प्रति हेकटर बोनसची घोषणा झाली. नवीन बोनस पद्धतीत थेट शेतकऱ्यांच्या नावाने पैसे जमा होणार आहे. छत्तीसगडमधून धान आणून बोनस लाटणाऱ्यांना,एजंट, व्यापाऱ्यांना यानिमित्ताने चाप बसणार आहे. 70 हजार कोटींचे प्रकल्प राज्यात येणार आहेत. यात जवळपास 45 हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात होईल. 35000 कोटींच्या प्रकल्पांची मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील पहिले अधिवेशन यशस्वी ठरले. रोज जे लोक लोकशाही विरोधात आवई उठवत होते ते केवळ 46 मिनिटे या अधिवेशनात होते यातून त्यांचे लोकशाही प्रेम दिसले या शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लक्ष्य केले.32 वर्षांच्या युवकाला सरकार घाबरल्याचा आरोप करणारे आदित्य ठाकरे यांनाही फडणवीस यांनी रोखठोक उत्तर दिले. ‘नाखून कटा के शहीद होना’ यासारखा हा प्रकार आहे. त्यांच्या पिताश्रीनाच आम्ही घाबरलो नाही असा इशाराही दिला