माजी मंत्री अनिल देशमुख यांची टीका
नागपूर. राज्यात अवकाळी पावसाने कहर केलेला आहे. शेतकरी संकटात असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Chief Minister and Deputy Chief Minister ) अयोध्येला जाणे योग्य नाही. त्यांनी अयोध्येला जाण्याची ही योग्य वेळ नाही (This is not the right time to go to Ayodhya), अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख (Former minister Anil Deshmukh ) यांनी आज पत्रकार परिषदेत केली. विदर्भ, मराठवाडा व कोकणसह राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गहू, कांदा, मिरची, निंबू, संत्रा, आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप नंतर रब्बी हंगामही हातचा गेला आहे. अशा परिस्थितीत हवालदिल शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले. अयोध्येला जाण्याबद्दल विरोध नाही. पण, ही वेळ योग्य नव्हती असे देशमुख म्हणाले. महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा 16 एप्रिलला नागपुरात होता आहे. तिन्ही पक्ष त्यासाठी कामाला लागले असून ही सभा निश्चितच यशस्वी होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कुणाच्या आंदोलनामुळे सभा रद्द होणार नाही
संभाजीनगरच्या सभेचा भाजपना धसका घेतला आहे. त्यामुळेच नागपूर येथील सभेला विरोध केला जात आहे. पण, आम्ही सभेसाठी रितसर परवानगी घेतलेली आहे. मैदानात यापूर्वीही अनेक कार्यक्रम झालेले आहेत. नीट विचार करूनच सभास्थळ ठरवण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाने केलेल्या आरोपात तथ्य नाही. कोणी आंदोलन केले म्हणून सभा रद्द होणार नाही असे देशमुख म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही घटक पक्षांचे प्रत्येकी दोन नेते बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शरद पवारांची मागणी योग्यच
कोरोनाच्या साथीतून सावरणाऱ्या दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थाची आयात करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रीय पशू व दुग्धमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकार तूप आणि लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थाची आयात करणार आहे. या संदर्भातील केंद्र सरकारचा कोणताही निर्णय हा स्वीकार करण्याजोगा नाही असे पवारांनी म्हटले होते. पवारांनी घेतलेली भूमिका एकदम याेग्य होती. केंद्र सरकारने पवारांचे म्हणणे ऐकून दुग्धजन्य पदार्थाची आयात करू नये. शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी त्यांनी केली.