सैतानी कृत्य… बापाकडून 3 वर्षीय मुलाचा खून

0

मद्यधुंद अवस्थेत आवळला गळा : स्वतःवरही केले चाकूने वार

चंद्रपूर. पित्याने दारूच्या नशेत अवघ्या 3 वर्षांच्या पोटच्या मुलाचा गळा आवळून खून (father murdered his 3-year-old son) केला. त्यानंतर स्वतःवरही चाकूने सपासप वारकरून घेत आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide by stabbing himself with a knife) केला. रविवारी पहाटे चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील राजोली (Rajoli in Mool Taluka of Chandrapur District) गावात ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. प्रियांशु गणेश चौधरी (३) असे मृत मुलाचे तर गणेश विठ्ठल चौधरी (३१) असे जखमी बापाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून मुलच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी तो दारू पिउन घरी आला होता. पत्नीला बेदम मारहाण केली. यामुळे पत्नी घाबरून घरून निघून गेली. याप्रकाराने गणेशचा संताप अधिकच अनावर झाला होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे.
आरोपी गणेश चौधरी हा पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे वास्तव्यास होता. गुरुवारी तो दारू पिऊन झिंगलेल्या अवस्थेत घरी परतला. त्यानंतर पत्नीसोबत भांडण उखरून काढली. तिला बेदम मारहाण केली. पती डोक्यात सैतान शिरल्याप्रमाणे वागत असल्याने ती कमालीची घाबरली. आहे त्या अवस्थेतच ती घरून निघून गेली. तेव्हापासून गणेश आणि मुलगा प्रियांशु हे दोघेच घरी होते. तेव्हापासून आरोपी सतत दारूच्या नशेतच होता. रविवार पहाटे ५ वाजता दरम्यान दारुच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबून खून केला. स्वताच्या गळ्यावर चाकुने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. दारुच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबुन खुन केल्याची घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. गावातील कुणीतरी मूल पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुमित परतेकी सहकाऱ्यांसह गावात दाखल झाले. पंचनामा करीत आरोपी गणेशला ताब्यात घेण्यात आले. तो गंभीर जखमी असल्याने मुलच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. आरोपी पित्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखला करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुमित परतेकी व चमू करीत आहेत.