बक्षिस आसणाऱ्या दोन महिला नक्षली ठार
गोंदिया(Gondia). मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh ) नक्षलग्रस्त बालाघाट (Naxal infested Balaghat ) परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास पोलिस – नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक (Clash between Police – Naxalites ) झाली. यात दलमच्या एरिया कमांडर आणि गार्ड असलेल्या दोन प्रमुख महिला नक्षलवादी ठार (Two women naxalites killed ) झाल्या. या दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या कारवाईने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे. बराचवेळ दोन्ही बाजुने गोळीबार सुरू होता. दीर्घकाळ शांत असलेली नक्षल चळवळ गडचिरोली, गोंदिया जिल्हा व लगतच्या भागात भागात पुन्हा डोके काढत असल्याचे चित्र आहे. या भागात सातत्याने नक्षली आणि पोलिसांच्या कारवायांचे वृत्त समोर येत आहे.
मध्यप्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्यातील जंगलात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास पोलिस – नक्षल्यांमध्ये चकमक झाली. घटनेनंतर वरिष्ठांना सूचना दिली गेली. आयजीपी बालाघाट संजय कुमार, बालाघाटचे पोलिस अधीक्षक समीर सौरभ आणि हॉक फोर्सचे उच्च अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितुनासर गढी पोलिस स्टेशन हद्दीतील कडला जंगलात हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात जवानांनी सुनीता आणि सरिता या दोन महिला नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले. सुनीता ही टाडा दलमच्या भोरम देव, एरिया कमांडरमध्ये एसीएम भोरम देव होती. ती सध्या विस्तार दलममध्ये काम करत होती. तर सरिता नक्षलवादी कबीरची रक्षक होती. त्यासोबत ती खट्यामोचा दलममध्ये राहात होती. सध्या ती विस्तार दलममध्ये सक्रिय होती. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले की, मृत नक्षलवाद्यांकडून बंदुका, काडतुसे, मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांची शस्त्रे आणि खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या घटनेनंतर बालाघाट पोलिसांनी कडलाच्या जंगल परिसरात हॉकफोर्ससोबत संयुक्तरीत्या शोधमोहीम सुरू केली आहे. बालाघाट जिल्ह्यात गेल्या वर्षीही पोलिसांनी वेगवेगळ्या तीन घटनेत ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.