छत्रपती संभाजीनगर : (Chhatrapati Sambhajinagar)रमजान(Ramadan Eid)ईद (Akshaya Tritiya)अक्षय तृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती, परशुराम जयंती असे (Hindu-Muslim)हिंदू- मुस्लिम बांधवांचे सण एकत्र आल्यामुळे फुल बाजार वधारला आहे.गुलाबांच्या फुलांची मोठ्या प्रमाणात अवक झाली असून फुल व्यवसायिक या फुलांच्या पाकळ्या करून विक्री करत आहे. आपल्या वडीलधाऱ्या माणसांना फुले वाहिली जातात, त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या करून सध्या व्यवसायिक दीडशे ते दोनशे रुपये प्रमाणे विक्री करत आहे. यावेळी तीन ते चार टन गुलाब शहरात दाखल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. साडेतीन मुहूर्तपैकी एक आज अक्षय तृतीया असल्यामुळे हिंदू समाजामध्येही पूजेला महत्त्व आहे. त्यामुळे फुलाची मागणी वाढली आहे. अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.