बुलढाणा – (BULDHANA)समृद्धी महामार्गावर उद्घाटन झाल्यापासून अपघातांची मालिका रोज सुरूच आहे. या अपघातांना विविध घटक कारणीभूत आहेत. या (accidents)अपघातांची दखल प्रशासनाने घेतली असून येथील अपघात कमी करण्यासाठी आता समृद्धी महामार्गावरील वाहनांची तपासणी करून वाहनांचे टायर निकृष्ट असल्यास या वाहनांना ब्लॅक लिस्ट करण्यात येत आहे. ही मोहीम बुलढाणा आरटीओ विभागाने सुरू केली आहे. आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इंटरचेंज पॉईंट जवळून मोहिमेला सुरुवात करण्यात आली.