नागपूर : (NAGPUR)मंगलमूर्ती ते जयताळा रस्त्याचे काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. या रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत्या फ्लॅट स्कीममुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. काही लोक मतांच्या(POLITICAL) राजकारणात रस्त्यावरील अतिक्रमणाना अभय देत आहेत. या भागातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या भागातील रहिवाशांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री (NITIN GADKARI)नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्त्याच्या कामासाठी निवेदन दिले. स्थानिक समस्येची माहिती देऊन जयताळा परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली. विशेष म्हणजे जयताळा गावात एक किमी अंतरात चार पेट्रोल पंप आहेत. बाहेरील वाहनेही ये-जा करीत असल्याने दररोज अपघात होत आहेत. रिंगरोड मंगलमूर्ती चौक ते वैशाली नगर हा चौपदरी रस्ता शासनाने मंजूर केला आहे. हा रस्ता नागपूर (Municipal Corporations)महानगरपालिकेने मास्टर प्लॅन अंतर्गत मंजूर केला आहे.हा रस्ता तातडीने तयार करण्याची नागरिकांची मागणी दोन दशकांपासून सुरू आहे. हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी ना गडकरी यांना केली. शिष्टमंडळात प्रशांत देशपांडे, लक्ष्मण आसवानी, राजेश श्रीवास्तव, चंद्रकांत शिवणकर, अजय पुराणिक, अविनाश पाटील, अमित एरणे, कमल शर्मा, धनेवार यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांचा समावेश होता.