जालना- (JALANA)विरोधी पक्षनेते (AJIT PAWAR)अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत. अजित पवार बहुमताच्या बाजूने आल्यास राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री (RAOSAHEB DANAVE)रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. दानवे म्हणाले,अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे सगळ्या (MAHARASHTRA)महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे असंही ते म्हणाले . गुवाहाटीला असताना आमदारांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडलं नसून तेच पायात पाय गुंतून पडले त्यानंतर शिंदेंना भाजपने पाठिंबा दिल्याचे दानवें यांनी सांगितले.