कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर वीज पुरवठा सुरळीत
नागपूर दि. २१ एप्रिल २०२३ :(NAGPUR) शहरात गुरुवारी रात्री भयानक वादळासह आलेल्या पावसामुळे (Mechanism of mass distribution)महावितरणच्या यंत्रणेला मोठा फटका बसला.या वादळात शहरात सुमारे ५० ठिकाणी झाडांच्या फांद्या,बॅनर चे कापड वीज वाहिन्यांवर कोसळल्याने वीज तारा तुटून वीज पुरवठा (Power supply)विस्कळीत झाला.गुरुवारी पाऊस कोसळत असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर अथक कर्तव्य बजावून बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरु केला.मात्र नरेंद्र नगर व अजनी परिसरातील काही भागात मोठी झाडे कोसळ्याने वीज पुरवठा दुरुस्तीचे काम दीर्घकाळ चालले. आज शुक्रवारी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,मुख्य अभियंता(Dilip Dodke) दिलीप दोडके यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन दुरुस्ती कामांना अधिक गती देण्याचे निर्देश दिले.
शहरातील वादळाचा सर्वात जास्त प्रभाव नागपूर पश्चिम भागात दिसून आला. नरेंद्र नगर,मनीष नगर त्रिमूर्ती नगर ,लक्ष्मी नगर,बेसा,तात्या टोपे उद्यान,चितळे रोड ,बिनाकी या भागात वादळी पावसामुळे मोठ-मोठी झाडे,झाडांच्या फांद्या,बॅनर ची कापडे वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज तारा तुटून वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळीजाऊन सर्वप्रथम ३३ व ११ किलोवॅटच्या उच्चदाब वाहिन्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य दिले .त्यानंतर इतर लघुदाब वाहिन्यांवरील (Power supply) वीज पुरवठा सुरळीत करण्यास सुरवात केली. शहरातील बहुतांश भागात टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.अनेक ठिकाणी पहाटेपर्यंतही हे काम सुरु होते.
अजनी परिसरातील सावरकर नगर ,सेंट्रल एक्ससाईज कॉलोनी,नरेंद्र नगर येथे मोठी झाडे कोसळल्याने महावितरणच्या संपूर्ण वीज तारा व पोल मोठया प्रमाणात नुकसानग्रस्त झाले.नरेंद्र नगर भागात सर्वाधिक नुकसान झाले.विशेषतः या भागातील खुल्या मैदान जवळील वीज तारांवर मोठ-मोठाली झाडे कोसळल्याने या झाडाच्या फांद्या बाजूला करून त्या खांबावरील वीज तारांना परत जोडणी करण्याची मोठी कसरत महावितरण व (Municipal Corporations)महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावी लागली.त्यामुळे या भागातील वीज पुरवठ्याचे काम रात्रीपासूनच सुरु होते ते आज दिवसाही चालू होते. दुपारी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,मुख्य अभियंता दिलीप दोडके,अधीक्षक अभियंता अमित परांजपे,कार्यकारी अभियंता समीर टेकाडे,उपविभागीय अधिकारी मुकेश चौधरी यांनी नरेन्द्र नगर,श्रीनगर, विजयानंद सोसायटी इत्यादी भागास भेट दिली व वीज यंत्रणेच्या दुरुस्ती कामाबाबत दिशानिर्देश दिले व कामांना अधिक गती द्यावी असे सांगितले.
वादळी पावसामुळे प्रभावित झालेलय वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी महावितरणची संपूर्ण यंत्रणा गुरुवारी रात्रभर व आज शुक्रवारी पूर्ण दिवस वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्पर होती.या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना वीज ग्राहकांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगात महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.
अंडा रेशमी पराठा आणि डेलगोना कॉफी | Egg Reshmi Paratha Recipe | Dalgona Coffee Recipe | Ep- 114 |