फिजिओथेरपी स्कूल आणि सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा 2023 पदवीदान समारंभ आयोजित

0

 

नुकताच 15 एप्रिल 2023 रोजी साई सांस्कृतिक सभागृह, शंकर नगर नागपूर येथे फिजिओथेरपी स्कूल आणि सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरचा येथे मास्टर ऑफ फिजिओथेरपी ( एम.पी टीएच) आणि बॅचलर ऑफ फिजीयो थेरपी (बी पी. टीएच.)उत्तीर्ण 2023बॅचचा पदवीदान समारंभ साजरा करण्यात आला.

पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी राज्यसभा सदस्य, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर प्रख्यात(Pediatrician) बालरोगतज्ञ आणि कार्यकारी संचालक आणि कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थहँड डिसॅबिलिटी (COMHAD) काॅमहॅड चे माजी अध्यक्ष (Dr. Uday Bodhankar)डॉ. उदय बोधनकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. सुरवात पारंपारिक दीप प्रज्वलन डॉ उदय बोधनकर,
डॉ उमांजली दामके,
डॉ शोभा भावे,
श्रीमती मीना जुगलकिशोर राठी यांच्या आजी
डॉ नयनिका दास अधिकारी पीजी विद्यार्थिनी आणि
डॉ दीपा अनिलकुमार मेनन यूजी विद्यार्थिनी द्वारे करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले .

फिजिओथेरपी स्कूल आणि सेंटरच्या प्राचार्या आणि प्राध्यापक(Dr. Umanjali Damke) डॉ. उमांजली दामके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा.
डॉ. विकास महात्मे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबोधित करताना व्यावसायिक व्यवहारात कौशल्य आणि सेवा वृत्तीचे महत्त्व सांगितले.
डॉ उदय बोधनकर यांनी रुग्णाच्या संपूर्ण पुनर्वसनात फिजिओथेरपीचे महत्त्व सांगितले.
डॉ शोभा भावे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
फिजिओथेरपी स्कूल आणि सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम भौतिकोपचार महाविद्यालयांपैकी एक आहे.
सुश्री बुतुल जेहरा खान ही विद्यापीठात दुसरी आली आहे तर सुश्री शेफाली धीमान ही महाराष्ट्रआरोग्यविज्ञान विद्यापीठ नाशिक (MUHS) अंतर्गत 4000 विद्यार्थ्यांपैकी विद्यापीठातून तिसरी आली आहे.
कु. सोनलने इण्डीयन असोसिएशन ऑफ फिजियोथेरेपिस्टस कडून वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीचा पुरस्कार मिळवला आहे.

उद्घोषक व निवेदन हृतुजा नाल्हे आणि सूत्रसंचालन संपदा भुतेकर यांनी केले.

समृद्धी मुस्तिलवार व मनस्वी गावंडे यांनी आभार मानले.
कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला.