Filed in Lawjama वाघाच्या शोधासाठी वनविभागाचा लवाजमा दाखल

0

पेट्रोलिंगसाठी 4 सफारी व्हॅन, 1 कार, 7 वनकर्मचारी, 3 जवान सज्ज
बेसा. शहरालगत महिनाभरापासून वाघाने धुमाकूळ घातला (tiger has been on the prowl near the city for a month आहे. वाघाच्या हल्ल्यात गाय, बैलांसह जनावरांना जीव गमवावा लागला. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण (fear among farmers ) असल्याने शेतात जाणेही बंद केले. ग्रामस्थांचा वाढता रोष लक्षात घेऊन वाघाची दहशत घालविण्यासाठी वनविभाग तत्परतेने कामाला लागला (forest department started working promptly) आहे. सेमिनरी हिल्स येथील कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परिसरात वाघाशी संबंधित हालचालींचा शोध घेण्यात आला. राती व दिवसाही दोन सफारी वाहन व एका कारमधून वन कर्मचारी पोहोचले आहेत. डीएफओ नागपुरे, खापरे व नरेंद्र काळे यांनी तपास सुरू केला आहे. काळडोंगरी, पेवठा, सालई, खरसोली परिसरात वनविभागाचे पथक पट्टेदार वाघाचा शोध घेत आहेत. वनविभागाचे पथक पोहोचल्याने ग्रामस्थांना काहिसा दिलासा मिळाला असला तरी संकट अजुनही कायम असल्याची भावना शेतकऱ्यांसह ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
सुमरे महिनाभरापासून शहराच्या उंबरठ्यावर असणाऱ्या गावांमध्ये हा वाघ दिसतो आहे. अद्याप माणवावर हल्ला केला नसला तरी जनावरांवर हल्ले करून त्यांचा भडशा पोडतो आहे. काही ग्रामस्थांनी या वाघाला प्रत्यक्ष बधितले आहे. वाघाचे ठसेही दिसून येत आहे. प्रारंभी वनविभागाकडून गावकऱ्यांच्या दाव्याकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र शिकारीच्या घटना वाढत असल्याने वन विभागालाही दखल घ्यावी लागली आहे.

खरसोलीत 2 शावकांसह दिसला वाघ
आज सकाळी 11 वाजता खरसोली गावापासून 300 मीटर अंतरवार एका नाल्या शेजारी गावकऱ्यांना वाघ दिसून आला. त्याच्यासोबत 2 शावकही असल्याचे सांगण्यात येत आहे. गावकऱ्यांनी फोनवरून याबाबत वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर लागलीच गस्तीवर असलेले वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वाघाच्या शोध घेतला जात असल्याची माहिती बालू शिंगणे यांनी दिली.

कोट्……..
मृत जनावरांच्या मालकांना 75 टक्के नुकसानभरपाई
वाघाने गाय, बैल, म्हैस, बकरी आदी पाळीव जनावरींची शिकार केली आहे. काही जनावरे जखमीही आहेत. मृत जनावरांच्या पोस्टमार्टमसह अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वन विभागाकडून तातडीने 75 टक्के नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची ग्वाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आशिष मेश्राम, शेतकरी, पेवठा

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा