(Mumbai)मुंबई : राज्य शासन देखील इतर राज्यांप्रमाणे लव-जिहादवर कायदा बनवण्यावर विचार करीत आहे. खोटी ओळख सांगून आंतर-धर्मीय लग्न करणे आणि मुलींची फसवणूक होण्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलिसांसाठी एक प्रमाणित संचालन प्रक्रिया तयार करण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
(Chhatrapati Sambhajinagar)छत्रपती संभाजीनगरमध्ये कथितरित्या एका मुलीला खोटी ओळख सांगून तिचे दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करुन देण्यात आल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, पोलिसांना अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी एक प्रमाणित संचालन प्रक्रिया तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील. या मुद्द्यावर प्रत्येक पोलीस ठाण्याला संवेदनशीलता बाळगण्यास सांगितले जाईल आणि योग्य कारवाई करण्यात असक्षम राहिलेल्या अधिकाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. जर कोणतीही सज्ञान मुलगी आपल्या धर्माच्या बाहेर लग्न करत असेल आणि तिची फसवणूक झाल्याचे सिद्ध होत नाही, तोवर कायदा काहीच करु शकत नाही. त्यामुळेच या उपाययोजना केल्या जाणार आहेत. याशिवाय महिलांना अंमली पदार्थ देऊन आणि खोटी ओळख सांगून लग्नासाठी तगादा लावण्याच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणांमध्ये वाचवलेल्या महिलांवर गरजेनुसार मनोवैज्ञानिक उपचारही केले जातील, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन बाकीच्या राज्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा अभ्यास करुन योग्य निर्णयही घेईल, असेही त्याी सांगितले.