Former Agriculture Officer भुंकणाऱ्या कुत्र्याला गोळ्या घालून केले ठार, माजी कृषी अधिकाऱ्याचे कृत्य

0

बिडः रस्त्यावर जात असताना कुत्रा भुंकतो म्हणून एकाने त्याला चक्क बंदुकीची गोळी घालून ठार केल्याची विचित्र आणि संतापजनक घटना बिड जिल्ह्यातील परळी तालुक्यात उघडकीस आली आहे (Man shoots a dog for barking at him). या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला असून प्राणीप्रेमी या घटनेवर संताप व्यक्त करताहेत. या घटनेतील आरोपीची ओळखही पटली असून तो एक माजी कृषी अधिकारी असल्याचे परळी ग्रामीण पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले. रामराज घोळवे (रा. परळी) असे आरोपीचे नाव असून तो तो माजी कृषी अधिकारी असल्याची माहिती आहे.
परळीमधील धर्मापुरी फाट्याजवळ असलेल्या हॉटेलच्या आवारात ही घटना घडली. परळी-धर्मापुरी मार्गावर विकास बनसोडे यांचे हॉटेल आहे. या हॉटेलवर त्यांनी एक कुत्रा देखील पाळला आहे. हा कुत्रा त्यांच्यावर मोठ्याने भुंकत होता. कुत्र्याचं भुंकणे ऐकून हा अधिकारी चिडला आणि त्याचा पाठलाग करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हॉटेलच्या पार्किंगमध्ये या माजी अधिकाऱ्याने हे भयंकर कृत्य केले. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. कुत्र्याच्या मृत्यूमुळे संतप्त हॉटेल चालकाने या अधिकाऱ्याला जाब विचारला. या घटनेमुळं हॉटेलमधील कर्मचारीही धास्तावले आहेत. याप्रकरणी हॉटेलचालक विकास बनसोडे यांच्या फिर्यादीवरून परळी A case under section 428, 429 IPC, section 25(3) Indian Arms Act was registered at the rural police station. ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 428,429 भादवी, कलम 25(3) भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.