
नागपूर Nagpur – राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना Shivsena ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे आजपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. उद्धव ठाकरे हे पोहरादेवी येथे दर्शन घेऊन पालकमंत्री संजय राठोड Sanjay Rathore यांचा बालेकिल्ला असलेल्या दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या सभेमुळे शिवसैनिकात उत्साह संचारला आहे. ठाकरे गटाला सोडून गेलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्या सडेतोड वक्तव्याचा यानिमित्ताने सामना करावा लागणार आहे.Former Chief Minister Uddhav Thackeray received a warm welcome everywhere उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी हजारो शिवसैनिक आणि आम्ही उत्सुक आहोत असे मत यवतमाळचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केले. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असून जागोजागी पोस्टर्स, बॅनर लावून वातावरण निर्मिती ठाकरे गटाने केलेली आहे. उद्या अमरावतीवरून नागपुरात आगमन झाल्यानंतर सायंकाळी वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यकर्ता मेळावा होणार आहे.