नागपूर-उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावर राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया ( Forest Minister Sudhir Mungantiwar) व्यक्त केली आहे. “उद्धव ठाकरे हे मजबुरी म्हणून दौऱ्यावर आहेत. काय करतील ते? करोनामध्ये दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे हे आमच्याकडे आलेच नसते. तेव्हा काहीच केले नाही, घरी बसले म्हणून आता दौरे करावे लागताहेत”, असा टोला मुनगंटीवार यांनी ठाकरेंना लगावला. मुनगंटीवार म्हणाले, “शेवटी कधी ना कधी कष्ट करावे लागतात. एकतर अगोदर अभ्यास करा मग बाकी जीवन सुखाचे करता येते. सुरुवातीला अभ्यास नाही केला नाही तर बाकी जीवन कष्टाचे असते, असे सूत्र आमच्या शिक्षकांनी अभ्यास करताना सांगितले होते. ते त्यांच्या शिक्षकांनी सांगितले नसावे”, अशी कोपरखळीही मुनगंटीवार यांनी लगावली.sudhir mungantiwar Touring is Uddhav Thackeray’s compulsion-Sudhir Mungantiwar
उद्धव ठाकरे हे ९ व १० जुलै असे दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. ते कार्यकर्ते व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध पोहरादेवी मंदिरालाही भेट देणार आहेत व सभाही घेणार आहेत.