शिवसेनेच्या मंत्र्यांवर प्रत्येकी पाच आमदारांची जबाबदारी

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर गट सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आमदारांच्या या भावना लक्षात घेऊन आता शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यावर पाच आमदारांची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. आमदारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे तसेच आवश्यकता असेल तिथे ती बाब आपल्या लक्षात आणून देणे ही जबाबदारी या मंत्र्यांना पार पाडावी लागणार आहे. याशिवाय या आमदारांना पुन्हा निवडून कसे आणण्याची जबाबदारीही संबंधित मंत्र्यांवर असेल.
शिवसेनेच्या आमदारांचे म्हणणे असे होते की, भाजपबरोबर गेल्यानंतर अधिक निधी मिळेल. मतदारसंघात मविआ काळापेक्षा अधिक कामे करता येतील, असे सत्तांतराच्या वेळी आम्हाला सांगण्यात आले होते. वर्षभरात वेगळाच अनुभव आला. आमच्याच पक्षाचे मंत्री आम्हाला विचारायला तयार नाहीत. आमचीच कामे होत नाहीत, अशी जवळपास सर्वच आमदारांची तक्रार आहे. गेले काही महिने वाट पाहून अखेर शनिवारच्या बैठकीत आम्ही मुख्यमंत्री शिंदे यासंदर्भात निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.