06MREG9 अमरावती बाजार समिती सभापतीकरीता मोर्चेबांधणी
अमरावती, 6 मे : मेबाजार समितीवर तब्बल २४ वर्षांनंतर सहकार पॅनलला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. पहील्यादांच या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढले आणि बहुमतात निवडुन देखील आले. त्यामुळे सभापतीपद अविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रकाश काळबांडे, हरीशमोरे, श्रीकांत बोंडे यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याकरिता मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. सभापतीपदाच्या निवडीमध्ये कोणाच्याही नाराजीचा सूर येऊ नये, याकरिता आ. ॲड यशोमती ठाकूर यांनाही काळजी घ्यावी लागणार आहे.
अमरावती बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाल्याने सहकार पॅनलमधीले कुणाच्या गळ्यात सभापतीची माळ पडेलयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आ. यशोमती ठाकुर यांच्या गटातील संचालक सर्वाधिक असल्याने त्यांच्याच गटातील संचालक सभापती पदाचा शर्यतीत असल्याने सद्या घडीला हरीश मोरे, श्रीकांत बोंडे यांच्यासह प्रकाश काळबांडे यांच्या नावाची चर्चा सुरू ‘आहे. काहींनी मात्र याकरीता लॉबिग सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात पहील्या क्रमाकाची अमरावती बाजार समिती असून, येथे कोट्यावधीची वार्षिक उलाढाल सुरू असते. त्यामुळे सहकारात येथील सभापतीला अनन्यसाधारण महत्व आहे. या बाजार समितीवर तब्बल २४ वर्षानंतर एकाच पॅनलला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. पहील्यांच या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढले आणि बहुमतात निवडुन देखील आले. यामध्ये काँग्रेसच्या ९ संचालकांचा समावेश आहे. यातयशोमती ठाकुर गटाचे सर्वाधिक ६ संचालक आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे ३, शिवसेना ४, मनोज देशमुख १, बबलु देशमुख १ व अन्य १ असे संचालक असे संचालक निवडुन आले आहेत. त्यामुळे सभापती पदावर यशोमती ठाकुर यांच्या गटातीलच संचालक विराजमान होण्याची दाट शक्यता आहे.. अशातच हरीश मोरे यांच्यासह श्रीकांत बोंडे, प्रकाश काळबांडे आणि किशोर चांगेले यांचेही नाव चर्चेत आहे. त्यानंतर शिवसेनेचे ४ संचालक असल्याने उपसभापती पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. याकरीता नाना नागमोते यांच्यासह प्रविण अळसपुरे आणि भैय्या निर्मळ यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. अशाच राष्ट्रवादीचे तीन संचालक निवडुन आल्याने त्यांच्याकडुन देखील पदाकरीता आग्रह होण्याची शक्यता आहे. सर्वांचीच यापदाकरीता लॉबिग सुरू झाली आहे. त्यामुळे पॅनलमधील सर्व नेत्यांना समान न्याय देण्याकरीतानेत्यांचे कायनियोजन आहे, अखेर कुणाच्या खांद्यावर बाजार समितीची जबाबदारी सोपविली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.