Home Artical Blog स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा नियतीचा एक दुर्मिळ चमत्कार!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा नियतीचा एक दुर्मिळ चमत्कार!

0

ह्या एकाच व्यक्तिमत्वाला होते शत पैलू! भारतमातेचे स्वातंत्र्य आणि संरक्षण या हेतुपोटी आयुष्यभर झुंजत राहिले स्वा सावरकर! देशासाठी स्वसुखाचा सहजपणे त्याग करणारे, आयुष्याचा होमकुंड करणारे सावरकर कुटुंब!! आजही राष्ट्राला मार्गदर्शक ठरणारे विचार देणारे स्वा सावरकर!

२८ मे… स्वा सावरकरांची १४३ वी जयंती!! त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचावे, घरोघरी सावरकर वाचले जावे आणि मनामनात राष्ट्रभक्ती जागृत व्हावी म्हणून सावरकर विचार प्रसार, प्रचाराचे कंकण हाती बांधलेली संस्था म्हणजे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, पुणे या संस्थेच्या नागपूर शहर शाखेतर्फे आयोजित कार्यक्रम सागरा, प्राण तळमळला…. एक सांगीतिक अभिवाचन

सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात नेपथ्य आणि प्रकाशयोजना, पार्श्वसंगीतासह अभिनव पद्धतीने सादर होणारे हे अभिवाचन!! मा उपेंद्रजी कोठेकर (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा), मा संजय भेंडे (अध्यक्ष, नागपूर नागरिक सहकारी बँक),मा चंद्रकांत लाखे (प्रकाशक, लाखे प्रकाशन) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तुत अभिवाचन सादर झाले.

संहिता लेखन- महाराष्ट्रातील प्रसिद्ध सावरकर साहित्य अभ्यासक, लेखक आणि वक्ता डॉ. शुभा साठे
दिग्दर्शन- डॉ अनिकेत मुनशी
पार्श्वसंगीत- शशांक साठे
प्रकाशयोजना-ऋषभ धापोडकर
कलाकार- सुश्रुत मास्टे, आल्हाद मुनशी, मृणाल काटे, स्वाती गोंधळेकर, गौरव गोंधळेकर, डॉ अनुराधा मुनशी, डॉ अनिकेत मुनशी, डॉ शुभा साठे