
नागपूर (Nagpur), 17 एप्रिल
विदर्भ साहित्य संघाचे संस्थापक व अध्यक्ष आदरणीय ग.त्र्यं. माडखोलकर उर्फ भाऊसाहेब माडखोलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यान मालेचे आयोजन करण्याची विदर्भ साहित्य संघाची परंपरा आहे. त्यालाच अनुसरून रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी ग. त्र्यं. माडखोलकर व्याख्यान मालेअंतर्गत “अश्वत्थामा” या विषयावर वाचस्पती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या रसाळ आणि अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमेय दालन, विदर्भ साहित्य संघ, सीताबर्डी येथे सायं. ५.३० वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त आणि माजी न्यायमूर्ती मा. विकास सिरपूरकर राहतील. या कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मा. गिरीश गांधी यांची प्रमुख उपस्थिती राहील.
या कार्यक्रमाला रसिकांनी प्रतिसाद द्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीने केले आहे.
#NagpurNews #VidarbhaSahityaSangh #MarathiSahitya #Vyakhyanmala #Ashwatthama #CulturalEvent #BreakingNews #MaharashtraNews #Nagpur #LiteratureEvent #KnowledgeSharing #LocalNews
———————————



















