दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

0

अकोल्यातील न्यू तापडियानगरात संतापजनक घटना


अकोला. पाच ते सहा नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर बळजबरीने सामूहिक बलात्कार (Two minor girls were forcibly gang-raped ) केल्याची धक्कादायक व संतापजनक घटना शुक्रवारी रात्री अकोल्यातील न्यू तापडियानगरात (New Tapdianagar in Akola ) घडली. १४ व १६ वर्षीय दोन मुलींवर पाच ते सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. या नराधमांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची माहिती आहे. आज सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून समाजमन संतप्त आहे. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात (Civil Line Police Station ) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आज सकाळी दहा वाजता पासून सुरू करण्यात आली होती. पोलिसांनी संशयित आरोपीचा तसेच घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. आरोपींच्या शोधसाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे.
गत काही महिन्यांपासून अकोल्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.

अकोला शहरात सातत्याने प्राण घातक हल्ले, चोरी, घरफोडी, हत्या, लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत. यावरून पोलिसांचे गुन्हेगारी वरील नियंत्रण सुटत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील न्यू तापडिया नगर भागात शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान दोन मुलींवर पाच ते सहा जणांनी मिळून गॅंग रेप केल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. पीडित मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगताच त्यांना धक्का बसला. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मुलींच्या पालकांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाणे गाठले.


पोलीस पथक संशयाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असून काहींना ताब्यात घेतल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना देखील गुन्हेगारीचा चढता आलेख आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर ही घटना घडल्याने संतप्त पडसात अधिवेशनातची उमटण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिस दलावरील दडपण चांगलेच वाढले आहे. बारकाईने प्रकरणाचा तपास केला जात आहे.