भावाच्या डोळ्यादेखत बहिणीला ट्रकने चिरडले

0

दोन दिवसांवर होता साखरपुडा ; तुमसर तालुक्यातील हृदयद्रावक घटना


भंडारा. ट्रकने धडक दिल्याने भावाच्या दुचाकीवरू जाणारी बहिण रस्त्यावर कोसलळी. मागून काळ बनून आलेल्या भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने बहिणीचा भावाच्या डोळ्यादेखत मृत्यू (Sister died in front of her brother after she came under the wheel of truck) झाला. तर, भाऊसुद्धा गंभीर जखमी (Brother also seriously injured ) आहे. तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलावर (railway flyover at Devadi in Tumsar taluk) ही दुर्दैवी घटना घडली. दोनच दिवसांवर तिचा साखरपुडा होणार होता. यामुळे घरात आनंदी वातावरण असण्यासह लगबगही सुरू होती. बहिणीला साखरपुड्यासाठी बॅग हवी होती. यामुळे भाऊ आपल्या दुचाकीवरून तिला बँग खरेदी करण्यासाठी घेऊ गेला होता. खरेदी केलेली बॅग घेऊन बहिण-भाऊ गावाकडे परतत होते. नियतीला हा आनंद पहावला नाही. साखरपुड्याच्या दोन दिवसांपूर्वी नवऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
किरण सुखदेव आगाशे (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर लोकेश सुखदेव आगाशे (२१) रा. निलज खुर्द, ता. मोहाडी, असे जखमीचे नाव आहे. किरण मुंबईत सीआरपीएफ कॅम्पमध्ये सेवेत होती. विवाह ठरल्यामुळे आठच दिवसांपूर्वी ती गावी आली होती. दोन दिवसांनी साक्षेगंध होणार होते. कार्यक्रमाचे सामान ठेवण्यासाठी सुटकेसची गरज होती. तिने लोकेशला बॅग खरेदीसाठी सोबत चलण्याबाबत विचारणा केली. लोकेशनेही अगदी सहजतेने होकार दिला. दोघेही दुचाकीने तुमसर येथे बॅग खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून दुचाकीने ते निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने दोघेही भाऊ-बहिण रस्त्यावर पडले. दरम्यान, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर भाऊ लोकेश गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच आई व वडिलांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सतत ट्रकवाहतूक सुरू असल्याने या भागात अपघात नित्याचेच झाले आहे. आजच्या दुर्दैवी घटनेनंतर जमाव संतप्त झाला होता. पोलिसांनी समजून काढत जमावाला शांत केले.