विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना शंका
नागपूर. काहीवेळा जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयश येत असल्यामुळे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महापुरुषांचा अपमान (Insulting great men to divert attention from the main issues) करणारे वक्तव्य हत्यार म्हणून केली जात आहेत का, अशी शंका विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील राजकीय नेत्यांकडून महापुरुषांबाबत सातत्याने आक्षेपार्ह, अवमानकारक वक्तव्ये होत आहे. यावरुन राज्यभरात वातावरण ढवळून निघाले (stir in the state) आहे. या बाबत नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महापुरुषांबाबत चुकीचे वक्तव्ये होत आहे, सीमाप्रश्नाबाबतही तीच तीच वक्तव्ये होत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हॅक झाल्याचे सांगितले जाते, मात्र, हा खुलासा अपुरा आणि निराधार वाटतो. कुठलाही कायदा करण्यापेक्षा मनात आदर असला पाहिजे, मात्र जे मनात आहे तेच तोंडात येत आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचेही त्या म्हणाल्या.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आलेल्या गोऱ्हे बोलत होत्या. त्या म्हणाल्या गेले दोन वर्षे कोविड मुळे नागपूरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही, त्यामुळे या वेळच्या अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील प्रश्न सुटावे अशी अपेक्षा आहे, अशा शब्दांत विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन आठवड्याचे जरी अधिवेशन असले तरी कामकाज भरपूर आहे, अधिवेशन ऐतिहासिक स्वरूपाचे असल्याचे त्या म्हणाल्या. याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबतही भाष्य केले. ‘मोर्चा ज्या हेतूने होतोय. माफी मागितली तरी महापुरुषांच्या बाबत होणारे वक्तव्य थांबणार आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सामान्य माणसाला अपेक्षा आहे की संवेदनशील पद्धतीने हा प्रश्न सोडविला गेला पाहिजे. महापुरुषांचा अपमान होणार नाही असे वक्तव्य करा, असे जर सांगावे लागत असेल तर यापेक्षा दुसरी वैचारिक दिवाळखोरी नाही, असा टोलाही गोऱ्हे यांनी लगावला आहे.