नागपूर : दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत नागपूरच्या संकेत अजय बुग्गेवार याने सुवर्णपदक व सिल्वर मेडल तसेच मिस्टर इंडिया स्पर्धा जिंकली. दिल्ली येथे पार पडलेल्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत सुध्दा सुवर्णपदक पटकावले. उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर त्याने हे मोठे यश, पुरस्कार प्राप्त केले आहे. बॉडी बिल्डिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने इंटरनॅशनल नेचूरल बॉडी युनिक तर्फे दिल्ली येथे पार पडलेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक तर दिल्ली येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याने मिस & मिस्टर इंडिया खितांब पटकावला. मेन्स फिजिक्स आणि क्लासिक फिजिक्स अशा प्रकारात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शन करीत मिस्टर वर्ल्ड डायमंड चॅम्पियनसचा गोल्ड मेडल खिताब आणि दिल्ली येथे पार पडलेल्या स्पर्धेत 69 किलो वजनी गटातून त्याने मिस अँड मिस्टर इंडियाचा पुरस्कार पटकावला. उत्कृष्ट कामगिरी बद्दल महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना नागपूर शहराचे अध्यक्ष सिद्धूजी कोमजवार यांनी अभिनंदन केले. संकेतचे आई-वडिलांनी कौतुक केले. विविध संघटनाकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा