गोंदिया GONDIYA – गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 (6) चे काम तसेच रेल्वे उड्डाण पुलाचेही काम सुरू आहे. यामुळे सौंदड गावातून सर्विस मार्गाने वाहतूक वळती करण्यात आली. मात्र या मार्गाची दुरावस्था झाल्याने वाहतूक करणेही कठीण झाले आहे. या बाबत यंत्रणेसह कंत्राटदारालाही वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याच्या मागणीला घेवून आज 29 डिसेंबरला गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत ने भीक मांगो आंदोलन केले आहे.कंपनीने 15 जानेवारी पर्यंत काम पूर्ण करण्याचे पत्र, आश्वासन ग्रामपंचायत व गावकऱ्यांना दिले आहे.
अनेक वर्षापासून नॅशनल हायवे क्रमांक 53 चे काम अनेक वर्षापासून प्रगती पथावर आहे. यासोबतच रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुद्धा सुरू आहे. या सर्व कारणांमुळे सध्या संपूर्ण वाहतूक सौंदड गावातून असलेल्या सर्व्हिस रोडने होत आहे. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. यासाठी ठेकेदार हटाव आणि भिख मागो आंदोलन करण्यात आले. या रोडमुळे स्थानिक नागरिकांना, व्यापाऱ्यांना, शाळेत व कॉलेजच्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय गावातील नागरिकांना दमा आणि श्वासाच्या विवध समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे ग्राम पंचायत सौंदड येथील सर्व नागरिक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, शेतकरी बांधव, आणि समस्त व्यापारी वर्ग मिळून आज भीक मांगो आंदोलन करत ठेकेदार हटाव आंदोलन केले आहे. तर या कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्थापक यांनी 15 जानेवारी पर्यंत काम पूर्ण करून देण्याचे लेखी पत्र दिले आणि गावकऱ्यांना जो पैसा भीक मागो आंदोलना गोळा केला तो 921 रुपये कंपनीला देण्यात आले.















