Home Top News मराठ्यांची संख्या 3 कोटी तरी आहे का? बबनराव तायवाडे यांचा जरांगेना सवाल

मराठ्यांची संख्या 3 कोटी तरी आहे का? बबनराव तायवाडे यांचा जरांगेना सवाल

0

 

जालना- मुंबईतील पायी मोर्चात 3 कोटी मराठा समाज सहभागी होईल असा दावा मराठा समाज नेते,आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय, यावर ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या 3 कोटी तरी आहे का? असा सवाल बबनराव तायवाडे यांनी जरांगेना केला आहे. आज तायवाडे यांच्या उपस्थितीत वडीगोद्री येथील ओबीसी समाजातर्फे सुरू असलेले साखळी उपोषण 27 व्या दिवशी मागे घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार आता कमी झालीय असा टोलाही तायवाडे यांनी हाणलाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही घरची शेती आहे का, असेही त्यांनी सुनावले आहे.