लाडक्या बहिणींच्या संदर्भात सरकार संवेदनशील

0

यवतमाळ (Yawatmal ): “लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये सरकार संवेदनशील असून, त्यांच्या खात्यात नियमित पैसे जमा होतील. अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे आवाहन माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी केले.

अफवा आणि अशा पद्धतीचे वक्तव्य कोणीही करू नये, लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये सरकार संवेदनशील आहे. आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नियमित पैसे जातील आणि लाडक्या बहिनींच्या संदर्भात जो पर्यंत देवा भाऊचं सरकार आहे जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचा पैसा बंद होणार नाही. प्रश्न राहिला योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना आणली, तेव्हा ज्या अतिशर्थी होत्या अर्ज तपासावे लागतात. अटी शर्थीच्या अधीन राहून तपासणे हे मला गैर वाटत नाही, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवाद व चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघावा. कापूस रस्त्यावर फेकून प्रश्न सुटले असते, तर अनेक प्रश्न सहज सुटले असते. लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखत शांततामय मार्गाने प्रश्न सोडवले पाहिजेत.”

“शिवभोजन योजनेसाठी दरवर्षी 126 कोटी रुपये खर्च होतात. भ्रष्टाचार झाल्यास तो शोधला पाहिजे, परंतु योजना बंद होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“संजय राऊत यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कोणी केला, हे त्यांनी पाहावे. अफझल खानच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्याचे काम आम्ही केले, मात्र मविआ सरकारने त्याला समर्थन दिले होते,” असे मुनगंटीवार म्हणाले.