Sudhir Mungantiwar : आम. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी मजुरांना मोठा दिलासा

0

मग्रारोहयो अंतर्गत कामावरील अकुशल मजुरांची थकीत मजुरी मजुरांच्या खात्यात जमा

चंद्रपूर (Chandrapur) जिल्हयातील पोंभुर्णा तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामावरील अकुशल मजुरांच्या थकीत मजुरीची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील विविध गावामधील मजुर महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामावर अकुशल मजुर म्हणुन काम करित आहे. शासनाकडुन निधी प्राप्त न झाल्यामुळे त्यांना गेल्या दोन महिन्यापासुन मजुरी मिळालेली नसल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मजुरांनी या समस्ये संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घेतली व आपली कैफियत मांडली. आ मुनगंटीवार यांनी रोहयो मंत्री ना. भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधत देय असलेला निधी शासनाकडुन त्वरीत उपलब्ध करून देण्याची विनंती केली व पाठपुरावा केला. आ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप मजुरांच्या खात्यात त्यांच्या मजुरीचे पैसे जमा झाले आहे.