

CP Radhakrishnan MAHA new Governor Haribhau Bagde
पंजाबचे विद्यमान राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा मंजूर करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातील विविध राज्यांत नवीन राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली आहे.
सध्याचे झारखंड व तेलंगणाचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल असतील.महाराष्ट्रातील भाजप नेते हरीभाऊ बागडे आता राजस्थानचे राज्यपाल असतील. जिष्णुदेव वर्मा हे तेलंगणाचे, ओमप्रकाश माथुर सिक्कीमचे, संतोष कुमार गंगवार झारखंडचे राज्यपाल असतील. रमन डेका छत्तीसगडचे, सी एच विजयशंकर मेघालयचे, गुलाबचंद कटारिया पंजाब व चंदीगडचे राज्यपाल असतील. लक्ष्मणप्रसाद आचार्य हे मणीपूरच्या अतिरिक्त कारभारासह आसामचे राज्यपाल असतील.
सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, हरीभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे २४ वे राज्यपाल आहेत. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून या संदर्भातील पत्रक जारी करण्यात आलं. या परिपत्रकामध्ये एकूण १० राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या आणि फेरनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असंही सांगण्यात आलं आहे.
कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल?
सी.पी राधाकृष्णन (६७) हे मूळ तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. कोइंबतूर मतदारसंघातून लोकसभेवर राधाकृष्णन हे दोन वेळा निवडून गेले. भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तामिळनाडूची सूत्रे होती. या कालावधीत त्यांनी रथयात्रा काढली होती. त्यासोबतच नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठीही त्यांनी आवाज उठवला होता. ते २०१६ ते २०१९ पर्यंत ऑल इंडिया कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते.
सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. तामिळनाडू आणि केरळसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या कित्येक वर्षांपासून ते संघ, जनसंघ आणि भाजप यांच्याशी संबंधित आहेत.
हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती
महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हरिभाऊ बागडे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा पदभार स्वीकारला होता.
कोणकोणत्या राज्याला मिळाले नवीन राज्यपाल?
महाराष्ट्र – सी. पी. राधाकृष्णन, राजस्थान – हरिभाऊ किसनराव बागडे, झारखंड – संतोषकुमार गंगवार, छत्तीसगड – रमण डेका, मेघालय – सी. एच. विजयशंकर, सिक्किम – ओमप्रकाश माथूर, पंजाब, चंडीगड (गुलाबचंद कटारिया), आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार) – लक्ष्मण प्रसाद आचार्य, तेलंगणा – जिष्णू देव वर्मा, पुदुच्चेरी (उप राज्यपाल) – के. कैलाशनाथन
दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बनवारीलाल पुरोहित यांचा पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून राजीनामा स्वीकारला आहे.
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित का इस्तीफा
राष्ट्रपति ने शनिवार को पंजाब के राज्यपाल बनवारीलाल पुरोहित का इस्तीफा स्वीकार कर लिया, वहीं तेलंगाना, राजस्थान, सिक्किम, झारखंड, छत्तीसगढ़, मेघालय और महाराष्ट्र में नए राज्यपालों की नियुक्ति पर मुहर लगा दी है। राष्ट्रपति भवन की ओर से जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, पंजाब के राज्यपाल और चंडीगढ़ केंद्र शासित प्रदेश के प्रशासक बनवारीलाल पुरोहित का इस्तीफा स्वीकार कर लिया है। इसके साथ ही हरिभाऊ किसनराव बागड़े को राजस्थान, जिष्णु देव वर्मा को तेलंगाना, ओम प्रकाश माथुर को सिक्किम, संतोष कुमार गंगवार को झारखंड, रामेन डेका को छत्तीसगढ़, सी.एच. विजयशंकर को मेघालय का राज्यपाल नियुक्त किया गया है।
इसके अलावा कुछ राज्यपालों का तबादला किया गया है। इनमें झारखंड के राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन को महाराष्ट्र, असम के राज्यपाल गुलाब चंद कटारिया को पंजाब और सिक्किम के राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य को असम में राज्यपाल के रूप में तबादला किया गया है। कटारिया को चंडीगढ़ संघ राज्य क्षेत्र का प्रशासक भी नियुक्त किया गया है। वहीं आचार्य को मणिपुर के राज्यपाल का अतिरिक्त प्रभार भी दिया गया है। इन राज्यपालों की नियुक्तियां उनके कार्यभार संभालने की तिथि से प्रभावी होंगी।