आज राष्ट्रवादीतील संघर्षावर सुनावणी

0

नवी दिल्ली – NCP राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षावर आज दिल्लीत निवडणूक आयोगापुढे महत्त्वाची सुनावणी होणार आहे. (Hearing on NCP in ECI) या सुनावणीत दोन्ही बाजूंकडील वकीलांकडून युक्तिवाद मांडले जाणार आहेत. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात शपथपत्र दाखल झाले आहेत.

अजित पवार यांच्या नेतृत्वात जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी बड्या नेत्यांनीही शरद पवार यांची साथ सोडली होती. त्यानंतर ही मंडळी भाजप -शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाली. आता अजित पवार गटाने मूळ राष्ट्रवादी पक्ष व चिन्हावर दावा केलाय. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यानुसार, निवडणूक आयोग या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेणार आहे. आयोगाकडून यावर इतक्यात निर्णय येण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.