

उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये असताना गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली.
या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे. या कारवाईत पोलिसांकडून नक्षलवाद्यांकडील अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात 12 ते 15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
याच माहितीच्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. जवळपास सहा ते सात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक चालली. अखेर या कारवाईत आतापर्यंत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारकडून C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची देखील माहिती समोर येत आहे.