इंस्टाग्राम वर पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी तणाव पुर्ण शांतता

0

 

अमरावती शहरातील वालगाव येथे काल (दि. १० जून) इंस्टाग्राम वर पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी मध्य रात्रीच्या सुमारास वलगाव मध्ये दोन गटांमध्ये तेढ निर्माण झाली. त्यामुळे पोलीस आयुक्त नविचंद्र रेड्डी. व डीसीपी सागर पाटील यांच्या सह शेकडो पोलिसांचा तगडा बंदोबस्त वलगाव येथे लावण्यात आला होता. त्यासोबतच राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सुद्धा आज वलगाव या गावात पाहणी केली व आता शांतता पूर्ण वातावरण आहे.