नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे याला याला भाकरी फिरवणे म्हणतात असे मला वाटत नाही तर ही निव्वळ धूळफेक असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.फडणवीस नागपूर जिल्ह्ययाच्या दौऱ्यावर असताना रामटेक येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल किंवा अजित पवार नाराज असणे हा त्यांच्या पक्षातंर्गत विषय आहे. मात्र याला भाकरी फिरवणे म्हणत नाही तर ही धुळफेक आहे आणि त्यांचा पक्षाचा तो विषय आहे असेही फडणवीस म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील विविध मतदार संघात जाऊन विकास कामासंदर्भात आढावा घेत आहे. केंद्र व सरकारच्या योजना सरकार आपल्या दारी योजनेची माहिती, घरकुलाच्या योजना , लोकांचे वैयक्तिक प्रश्न या सर्व विषयावर जनतेशी चर्चा करतो आहे. तेथील पदाधिकारी व कार्यकत्यार्शी संवाद साधत आहे. यामुळे प्रशासन पातळीवर अनेक गोष्टी मार्गी लागतात,काही ठिकाणी कामाची प्रगती कमी आहे. अशी वेळी अधिकाऱ्यांना तंबी दिली जाते.