दिल्लीतील मतदारांचा अनादर करणाऱ्या भाजप सरकारच्या अध्यादेशाचा निषेध
संविधानाचा अनादर करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध
आम आदमी पार्टी नागपूर द्वारे आज दिनांक 11/6/2023 रोजी केंद्र सरकारच्या लोकतंत्र विरोधी काळ्या अध्यादेशाच्या विरोधात बाईक रॅली काढण्यात आली. ही महा रॅली श्री देवेंद्र वानखेडे व जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. यावेळी प्रामुख्याने नागपूर संयोजक कविता सिंगल, संघटन मंत्री शंकर इंगोले, उपाध्यक्ष डॉ शाहिद अली जाफरी, सचिव भूषण ढाकुलकर, डॉ अमेय नारनवरे, काजी जी, विधानसभा संयोजक रोशन डोंगरे, नामदेव कांबळे, अजय धर्मे, अभिजीत जा, मनोज डफरे, युवा संयोजक श्याम बोकडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. ही बाईक रॅली संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपासनं सुरू झाली येथून संविधान चौक ते व्हेरायटी चौक ते झाशी राणी चौक ते मुंजे चौक पासून व्हरायटी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर ही रॅली संपुष्टात आली. ह्या रॅलीमध्ये 500 हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभाग केला.
दिल्लीतील लोकनियुक्त सरकारच्या प्रशासनातील अधिकारी नेमणे , बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी तर्फे देशभर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. बाईक रॅलीमध्ये आज आप स्थानिक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढून दिल्लीतील राज्य सरकारचे प्रशासकीय बदल्या व नियुक्ती करण्याचे अधिकार काढून घेत आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आम आदमी पार्टी सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तब्बल आठ वर्ष ही लढाई चालू होती. सुप्रीम कोर्टाच्या बेंच ने हे सर्वाधिकार पुन्हा एकदा दिल्लीतील लोकनियुक्त केजरीवाल सरकारकडे राहतील असा ऐतिहासिक निर्णय दिला. परंतु केंद्रातील भाजप सरकारने सुप्रीम कोर्टाला सुट्टी लागल्या दिवशी एक अध्यादेश काढत हे अधिकार पुन्हा आपल्या हातात घेतले आहेत. हा अध्यादेश दिल्लीतील मतदारांचा अवमान करणारा असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज निदर्शने करण्यात आल्याचे श्री देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये 70 पैकी 62 विधानसभा जागा जिंकून आम आदमी पार्टीने जनतेची कामे सुरू केली. परंतु त्यात केंद्र सरकार नियुक्त राज्यपालांमार्फत सतत हस्तक्षेप केला जात असून लोकांची कामे अडवली जात असल्याचा आरोप श्री जगजीत सिंग यांनी केला.
आता अध्यादेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजप सरकार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. यासंदर्भात आम आदमी पार्टी राज्यसभेमध्ये इतर सर्व विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.