नागपूर : कोण मोठे कोण लहान हे भाजप- शिवसेनेत महत्त्वाचे नाही. युतीचे भक्कमपणे सरकार आणत मविआच्या इनामिना डिकाला घराचा रस्ता दाखवायचा आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.
मोदी-शिंदे यांच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे.या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
बावनकुळे म्हणाले,आमची आपसात स्पर्धा नाही, मला जाहिरातीबद्दल माहिती नाही. ना मी कोणाला बोलण्यापूर्वी विचारलं. शिंदे-फडणवीस दोघे एकमेकांना विचारल्याशिवाय निर्णय घेत नाहीत. महाविकास आघाडी घरी जाईल, 100 पेक्षा कमी जागा मिळतील. कोणी काय करावे हा त्यांचा विषय आहे मात्र कुठलाही वाद निर्माण होऊ नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे नेते असतात.कुठलीही भूमिका ही मुख्यमंत्र्यांनाच मांडावी लागते आणि ते आम्ही स्वीकारलेले आहेत.या माविकास आघाडीला कसे 100 च्या आत रोखता येईल हेच आमचं एकमेव उद्दिष्ट आहे. पक्षात कोणाला मंत्री बनवायचं हा एकनाथ शिंदेचा अधिकार आहे यावर पुन्हा एकदा भर दिला. 2014 आणि 2019 मध्ये राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे जनतेने स्वीकारले होते. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. राज्याच्या हिताचे लोकप्रिय बजेट देवेंद्र फडणवीस यांनी मांडले, युतीला जनतेचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. यात देवेंद्र फडणवीस मागे पडले एकनाथ शिंदे पुढे गेले असं काहीही नाही. कुणाला जास्त पसंती आहे असा प्रश्नच उपस्थित होत नाही. शेवटी राज्याच्या जनतेला काय पाहिजे हे अधिक महत्त्वाचे आहे.कोण मागे कोण पुढे हा प्रश्न नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात डबल इंजन सरकारकडून अपेक्षा आहेत. 2024 मध्ये भाजप- सेना युतीचेच सरकार महाराष्ट्रात येईल.कुणाचेही महत्त्व कुणामुळे कमी होत नाही, शेवटी जनतेचा निर्णय असतो, जनता पसंती ठरवते. महाराष्ट्राच्या जनतेला शिंदे फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. दोघेही जनतेसाठी झटत आहेत. जनता युतीला पसंती देईल. युतीत लहान मोठं कोणी नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यापूर्वी देखील मंत्री असताना चांगले काम करत होते.
आता ते मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी आहे. त्यांच्याबद्दल कोणीही विनाकारण प्रश्न निर्माण करू नये त्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही. हे राज्य महत्वाचे असून राज्य टिकले तरच देश टिकणार आहे.हे निश्चितच सरकार डॅमेज कंट्रोल नाही, अडीच वर्षांत पेन नाही काढला असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.राष्ट्रवादी जास्त उद्धव ठाकरे यांचे आमदार कमी करायचे आणि मग सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करायचा हा प्लॅन तयार झाला होता म्हणून ते खिशात पेन ठेवत नव्हते अशी उपरोधिक टीकाही केली. इतरांचे सोडा शिवसेनेच्या आमदाराच्या पत्रावर सही करत नव्हते, त्यामुळेच पुढे पराभूत होण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगली भूमिका घेतली. उद्धव शिल्लक सेना आता किंचित सेना केली पाहिजे.चिन्ह मिळाल्याने शिंदे यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. बॅक ऑफिस या सगळ्या मागे काम करत आहे. अब्दुल सत्तार काम करत नाहीत हे सगळं त्यांच्याकडून तयार केलेल्या स्क्रिप्ट आहेत या स्क्रिप्ट बाहेर काढून दिवसभर ते दाखवतात असे विरोधकांना सूनवत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून ते उत्कृष्ट काम करतात असेही कबूल केले.
दरम्यान,ओबीसीला मिळाली त्याप्रमाणे मराठा समजाला सुद्धा इतर समाजाप्रमाणे स्कॉलरशिप देऊन परदेशात जाण्यासाठी लवकर निर्णय घेतला पाहिजे. भाजपवाले मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवतील अशा पद्धतीचे चुकीची माहिती पेरली जात आहे. आम्ही त्यांच्या विरोधात नाही.मोदीजींनी गरीब कल्याण योजनेत जाती,धर्म पाहिला नाही, सर्व योजना सर्वच समाजाच्या लोकांना मिळत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचा मुस्लिम आणि मागासवर्गीय यांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा अजेंडा आहे.