जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन म्हणून ओळखला जातो. भ्रष्टाचाराविरूद्ध देशातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सरकारी, बिनसरकारी, प्रायव्हेट संस्थेतील सर्व नागरिक एकत्र येऊन भ्रष्टाचारा विरूद्ध लढा देण्याचे पण करता. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिनाचे औचित्य साधून बातमीदारही सर्व नागरिकांना भ्रष्टाचार विरुद्ध लढा देण्याचे आवाहन करते.भ्रष्टाचार ही कोणत्याही एका देशाची समस्या नाही तर संपूर्ण जगाची समस्या आहे. याच पार्श्वभूमिवर 31 ऑक्टोबर 2003 ला संयुक्त राष्ट्र महासभेने एक प्रस्ताव मांडत आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर संपुर्ण जगात हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.
भ्रष्टाचार म्हणजे काय?
केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे तर नैतिक अपेक्षेचे पालन न करणे, किंवा इतर गैरव्यवहार-नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे भ्रष्टाचार होय.
प्रशासकीय भ्रष्टाचाराची प्रमुख कारणे
- भ्रष्टाचाराचे प्रमुख कारण वाढत्या गरजा व लोकांची बदलती मानसिकता हे आहे.
- दारिद्र्य, बेकारी, अमर्यादित गरजा, महागाई, तुटपुंजा पगार इत्यादी घटकांमुळे व्यक्ती भ्रष्टाचारास प्रवृत्त होते.
- प्रशासकीय कार्यकालीन कामकाज पद्धती ही वेळकाढू, दीर्घ मुदतीची आणि गुंतागुंतीची असते. यामुळे लाच देऊन लवकर कामे करवून घेण्यात येतात.
भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी नेमके काय करायचे हे सगळ्यानाच माहित नसते तर आज आपण आपले कायदा यांमध्ये आणि या विरूद्ध काम करणाऱ्या संस्थांबद्दल जाणून घेणार आहोत.
- भारतीय दंडसंहितेमध्ये कलम 161, 165 हे प्रशासकीय भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. या कलमानुसार भ्रष्टाचार हा दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी तीन वर्ष कारावस आणि दंडाच्या शिक्षेची तरदूद.
- भ्रष्टाचार प्रतिबंध करणारा कायदाही अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार भ्रष्टाचार हा दखलपात्र गुन्हा आहे. या कायद्यातंर्गत जर गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरूंगवासाची व तात्पुरते निलंबन करण्याची तरतूद.
- प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालून प्रशासनातील सचोटी राखण्याची भूमिका केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग घेते. हे विभाग गृह मंत्रालयाच्या शिफारशींप्रमाणे 1963 साली स्थापन झाले.
- भ्रष्टाचाराविरुध्द माहितीचा अधिकार हे एक महत्त्वाचे अस्त्र ठरू शकते. माहिती अधिकारामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता येऊन भ्रष्टाचारास पायबंद घातला जाऊ शकेल.
- केंद्र सरकारच्या निरनिराळ्या मंत्रालयात आणि सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे. या विभागाची स्थापना 1955 साली गृह मंत्रालय अंतर्गत झाली.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवसाचे महत्त्व
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवसाचे महत्त्व हे भ्रष्टाचाराविरोधातील लढाईला जागतिक स्तरावर गती देणे आहे. तसेच भ्रष्टाचार कसा रोखावा, यापासून कसा बचाव करावा हेही सांगते. या दिवशी अँटी करप्शन ग्रुप्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे ग्रुप्स भ्रष्टाचारविरोधी जागरूकता निर्माण करण्याचे काम करतात तसेच यापासून कसा बचाव करता येईल हेही सांगतात. लोकशाही संस्थांचा पाया कायम ठेवण्यासाठी भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून टाकणे गरजेचे आहे. कारण भ्रष्टाचार हा कायद्याला झुकवत निवडणूक प्रक्रियेला विकृत करतो. भ्रष्टाचारामुळे अनेक देशांचा आर्थिक विकास झालेला नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या आकड्यानुसार दरवर्षी १ ट्रिलियन डॉलर लाच म्हणून दिली जाते. तर २.६ ट्रिलियन डॉलर भ्रष्टाचाराद्वारे घेतली जाते. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमानुसार हे अनुमान लावले जात आहे की विकसनशील देशांत भ्रष्टाचारामुळे १० टक्के धनराशीचे नुकसान झाले
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवस इतिहास
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवसाचा इतिहास ३१ ऑक्टोबर २००३पासून सुरू झा. जेव्हा यूएन महासभेने भ्रष्टाचाराविरोधात संयुक्त राष्ट्राचे संमेलन स्वीकार केले होते. संयुक्त राष्ट्रमहासभेने तेव्हा ९ डिसेंबर हा दिवस भ्रष्टाचारविरोधी दिवस म्हणून सुरू केला होता. तर कॉन्वेश डिसेंबर २००५मध्ये लागू झाले होते. संपूर्ण जागतिक समुदायाला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि UNODC भ्रष्टाचारविरोधीच्या प्रथांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अग्रणी आहे.