ग्रामपंचायतला ग्रामस्थांची काळजी : भंडाऱ्यातील रेंगेपारमध्ये अभिनव उपक्रम
भंडारा. दिवाळी आटोपताच थंडू वाढू लागली (It is getting colder) आहे. रात्री आणि पहाटे वातावरणात चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. ग्रामीण भागात तर थंडीचा जोर अधिकच असतो. रात्री झोपताना पांघरूण गरजेचे ठरले आहे. त्यातच सकाळी उठून आंघोळ करणे, तेसुद्धा थंडा पाण्याने जीवावर येणारेच. त्यातही गार पाण्याने आंघोळ अस्वास्थ्याचेही कारण ठरू शकते. ही बाब लक्षात घेता भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) (Rengepar (Kohli) in Bhandara District) गावच्या ग्रामपंचायतीने फारच अनोखा उपक्रम राबवला आहे. गावातील लोकांना थंडीच्या दिवसांत ग्रामपंचायतीकडून गरम पाण्याचा पुरवठा (Hot water supply from Gram Panchayat) निःशुल्क केला जात आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत गावातील नागरिकांना गरम गरम पाण्याने आंघोळीचा आनंद घेता येत आहे. सकाळी दोन तास गरम पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
नागरिकांची काळजी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पण, गावाची गरज भागेल ऐवढे पाणी पाणी गरम होते कसे. ते ग्रामस्थांपर्यंत पोहोचते कसे. या सर्व उपक्रमासाठी होणारा खर्च भागतो कसा, असे अनेक प्रश्न पडू शकतात. पण, सरकारी योजनेतूनच हे सहज शक्य झाले आहे. स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत सोलर सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे वॉटर हिटर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात बसविण्यात आले आहे. या योजनेमुळे 120 कुटुंबांना गरम पाण्याचा पुरवठा होत आहे. सोलर वॉटर हिटरमुळे रोज दीड हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एका एजन्सीमार्फत सोलर वॉटर हिटर बसवण्यात आले आहे, सरपंच मनोहर बोरकर यांनी सांगितले.
ग्रामपंचायती कडून गावात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे सोलर वॉटर हिटर लावून गावातील लोकांना गरम पाणी पुरविणारे रेंगेपा (कोहळी) ग्रामपंचायत भंडारा जिल्ह्यातील पहिला प्रयोग आहे. याचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे. भर थंडीत वाफाळणाऱ्या पाण्याने आंघोळ करण्याचा मनमुराद आनंद ग्रामस्थ लुटत आहेत. गरम पाणी घरापर्यंत मिळत असल्याने ग्रामस्थांचा सरपण किंवा गॅसवर होणारा खर्चही कमी झाला आहे. पैसे वाचत असल्याचा अधिकचा आनंद ग्रामस्थांमध्ये आहे.
(It is getting colder)थंडीत आंघोळीसाठी गरम पाणी
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा