तरुणांना साजकार्याकडे आकर्षित करणे गरजेचे

0

डॉ. विकास आमटे : महानचा कृतज्ञता सोहळा

नागपूर. आदिवासी भागातला मोठा वर्ग आजही मूलभूत अधिकारापासून वंचित (large section of tribal areas are still deprived of basic rights ) आहे. समाजातील संवेदनशील लोकांनी आपल्या ज्ञानाचा वाजवी आणि तर्कशुद्ध गुंतवणूक केल्यास वंचितांचे कल्याण शक्य आहे. त्यामुळे तरुणांना पुन्हा एकदा समाजकार्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे, अशी साद ज्येष्ठ समाजसेवक आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे (Maharogy Seva Samiti Dr. Vikas Amte) यांनी रविवारी येथे घातली. मेळघाट येथे आदिवासींच्या आरोग्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या महान संस्थेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त संस्थेच्या माध्यमातून प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पर्सिस्टंटच्या दालनात कृतज्ञता सोहळा घेण्यात आला. त्यानिमित्त अध्यक्षस्थानावरून डॉ. आमटे बोलत होते. व्यासपीठावर जागतिक आरोग्य संघटनेचे माजी समन्वयक डॉ. नितीन वैरागकर, मेडिकलच्या माजी अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी, महानचे संस्थापक डॉ. आशिष सातव प्रामुख्याने उपस्थित होते.
कर्मयोगी बाबा आमटे यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा मी ठेकेदार आहे, असे सुरुवातीलाच नमूद करीत डॉ. आमटे म्हणाले, सव्वा कोटी जनता आजही कुष्ठरोगाने ग्रासली आहे. तरीही या देशात आजही कुष्ठरोगांसाठी स्वतंत्र रुग्णालय नाही. लाकूड आणि लोखंडाचा कसलाही वापर न करता कुष्ठरोगींनी बनविले भुकंपरोधक घरांचे मॉडेलही स्विकारले गेले नाही, हे दुर्दैवी आहे. राजकारणात पात्रता विचारली जात नाही की निवृत्ती नाही. मात्र समाजासाठी काम करणाऱ्यांना निवृत्तीचे सल्ले दिले जातात. आज विज्ञानामुळे सरासरी आयुष्यमान वाढले आहे. तर दुसऱ्या बाजूला नवीन काही तरी करण्याची उत्सूकता तरुणांमधून संपत आहे. त्यामुळे संवेदना जाग्य असलेल्यांनी आपल्या अनुभवाची एफडी वंचितांसाठी गुंतवून तरुणांना नव्याने जोडणे आवश्यक आहे.
प्रकृतीमुळे रुग्णालयात भरती असल्याने सोहळ्याला उपस्थित न राहू शकलेले रमेश कचोलिया यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे नागपूरकरांशी संवाद साधला. समाजसेवेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्यांनी वंचितांसाठी आयुष्य पणाला लावत असताना स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करता कामा नये, असे आवाहन कचोलिया यांनी केले. त्यानंतर आदिवासींच्या आरोग्याची नाडी सुधारायची असेल तर मानवी संसाधनाची आजही गरज आहे. त्यामुळे आहे रे गटातल्या सेवावृत्तींनी वर्षातील किमान आठ दिवस दुर्लक्षितांच्या कल्याणासाठी द्यावा, असे आवाहन डॉ. वैरागकर यांनी केले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा