जय प्रकाश द्विवेदी यांनी स्वीकारली वेकोलीची सूत्रे

0

 

नागपूर -वेकोलि ( WCL )चे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक म्हणून जय प्रकाश द्विवेदी यांनी कार्यभार स्वीकारला.कोळसा खाणकामातील कौशल्यासाठी ओळखले जाणारे जय प्रकाश द्विवेदी यांनी आज वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी संचालक तांत्रिक (नियोजन/प्रकल्प) ए.के. सिंग, मुख्य दक्षता अधिकारी अजय मधुकर म्हेत्रे, सर्व महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यांनी द्विवेदी यांचे अभिनंदन केले.

याआधी द्विवेदी हे WCL मुख्यालयात संचालक तांत्रिक (ऑपरेशन्स) म्हणून कार्यरत होते. त्यांनी कंपनीच्या संचालक (कार्मिक) पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे. द्विवेदी यांना कोळसा खाण उद्योगाचा 36 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. आयआयटी-बीएचयू वाराणसीमधून खनन अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर 1986 मध्ये त्यांनी कोल इंडियामध्ये खाण अभियंता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. डब्ल्यूसीएलमध्ये काम करण्यापूर्वी, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोल इंडियाच्या SECL, ECL आणि NCL या उपकंपन्यांमध्येही काम केले.खाण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सतर्फे ‘सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

 

बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live