नागपूर – केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ कांथा याची नागपूर पोलिसांकडून पुन्हा सखोल चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात एनआयएची टीम सुद्धा आज नागपूरात पोहचली असून सध्या एनआयएचे दोन अधिकारी नागपुरातील पोलीस जिमखाना येथे पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि सहकाऱ्यांकडून जयेश पुजारी कांथा बद्दल सखोल महिती घेत आहेत. नागपूरच्या सेन्ट्रल जेलमध्ये सध्या जयेशला ठेवण्यात आलेले आहे. NIA चे अधिकारी जयेशची चौकशी करण्यासाठी जेलमध्ये सुद्धा जाऊ शकतात अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.